Description
जोवर तुमचं आयुष्य सुरळीत वाटतं… तोवर तुम्ही सुरक्षित आहात.
पण एकदा अंधाराचं दरवाजं उघडलं… की परतीचा मार्ग अस्तित्वातच राहत नाही.जिथं प्रत्येक क्षण जगणं म्हणजे एक लढाई असते.
ही गोष्ट आहे काळ्या जादूची .जिथे आजोबांनी गुपिते जपली होती आणि आता त्यांच्या नातवाला सांगायची वेळ आली आहे .एक अशी जागा जिथे प्रकाशालाही परवानगी नाही…जिथं राक्षसी शक्तींचं राज्य आहे आणि जिथं लोकं अडकले आहेत — विसरले गेलेले… हरवलेले… आणि वाचण्याच्या आशेवर जगणारे.
पण या अंधारात एक गोष्ट मात्र जिवंत आहे
ही गोष्ट आहे अशा मित्रांच्या टोळीची ज्यांनी एकमेकांच्या शब्दावर शपथ घेतलीय की “कोणीच मागे नाही राहणार.”
कारण काली जादू जिथं भीती निर्माण करते…तिथे मैत्री जिद्द देते.
ही कथा आहे अशा मित्रांची…जे शोधतील गुप्त रहस्यं,उलगडतील जुनं सत्य आणि भिडतील त्या शक्तींना ज्या कोणालाही तोडू शकतात — पण मैत्र नाही.
त्यांचा प्रवास असेल विश्वासाचा ,त्यागाचा आणि अंतिम निर्णायक लढाईचा.
प्रश्न एवढाच आहे की ते पोहोचतील का शेवटपर्यंत?
कि अंधार त्यांनाही गिळून टाकेल?




Reviews
There are no reviews yet.