Description
रीमालाही असंच टेन्शन आलं असेल का? करावा का फोन तिला? – राहून राहून वाटत होतं श्रीधरला. अचानक मोबाईलचा स्क्रीनलाईट on झाला आणि त्याला स्वतःचंच हसू आलं. रात्रीच्या २.३० वाजता एखाद्या तरूण मुलीच्या मोबाईलवर फोन येणं म्हणजे तिच्या आईवडिलांवर केवढं संकट कोसळेल…त्याला घाम फुटलेले रीमाचे आईवडीलच डोळ्यासमोर आले….या कल्पनेनेच श्रीधरने स्वतःला आवर घातला. त्याला काय करावं सुचेना!
अशा अनेक कथा आणि कविता इथे वाचायला मिळतील.. सर्व नात्यांमध्ये गुंफलेल्या.. सर्वांमध्ये प्रेमाचा गंध असलेल्या शीतल करंदीकर..
आवडीने व व्यवसायाने भाषेशी नाळ जोडलेली ..
Linguists Academy या संस्थेची संस्थापिका म्हणून कार्यरत…
हिन्दी, मराठी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये काम…
या व्यतिरिक्त ‘उल्फत’ हे हिन्दी-उर्दू शेर व कविता असलेले पुस्तक; व ‘दोस्ती इंग्लिश शी’ हे इंग्रजी भाषेशी सहज सूर जुळवून देणारे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
लवकरच श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकांचे आजच्या काळातील व आपल्या जीवनातील महत्व सांगणारे इंग्रजी भाषेमधील पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस असून त्यासाठीचे लिखाण चालू आहे.
Reviews
There are no reviews yet.