Description
सध्या जगातील विविध अर्थव्यवस्था अंधारात चालत आहेत. ट्रम्प सरकारने मोठ्या प्रमाणात आयात कर धोरण राबविण्यास सुरवात केली आहे. चीन या देशावर तर २४५% आयात कर लावला आहे त्याला चीनने देखील सडेतोड उत्तर दिले असले तरी जागतिक व्यापार संतुलन कोलमडले आहे. अशा या अनाकलनीय, संदिग्ध व दोलायमान परिस्थितीत जगातील अनेक देशात आर्थिक मंदी, बेरोजगारी व कर्जबाजारीपणा वाढू शकतो. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील महत्वाची देशांतर्गत ग्राहक बाजारपेठ आहे. अशा या अस्थिर वातावरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सुदैवाने इतर देशाच्या तुलनेत कमी परिणाम अपेक्षित आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग असाच वर राहिला तरच जगातील विविध अर्थव्यवस्था या अस्थिर वातावरणातून सहीसलामत पुढे जातील अशी आज परिस्थिती आहे. भारत हा कधीही गरीब देश नव्हता व आजही नाही केवळ योग्य ध्येय धोरणे तसेच राजकीय आणि प्रशासन जेव्हा खऱ्या अर्थाने सक्षम, निरपेक्ष व प्रभावी झाले तर भारत जगावर राज्य करेल हे निश्चित आहे. अर्थव्यवस्था (आव्हाने, उपाय), सामाजिक प्रश्न त्यांची उकल तसेच नागरी प्रशासन या ३ ढोबळ विषयांवर मी गेले ३-४ वर्षे विविध लेख लिहीत आहे. सकाळ, सकाळ मनी, साप्ताहिक सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, पुढारी हि दैनिके तसेच अनेक संस्थांची मासिके यांनी माझे अनेक लेख वेळोवेळी प्रकाशित केले व त्याला वाचकांचा देखील भरपूर प्रतिसाद मिळाला. या माध्यमांचा मी आभारी आहे.
या पार्श्वभूमीवर या पुस्तकाद्वारे माझे प्रकाशित किंवा काही अप्रकाशित लेखांचे संकलन या पुस्तकाद्वारे करत आहे.




Reviews
There are no reviews yet.