Description
शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे एकमेकांशी जोडलेले आहेत व त्यामुळे दोघांची काळजी एकत्रितच घ्यावी लागते, ती काळजी कशी घ्यावी याचे उत्तम मार्गदर्शन म्हणजेच हे पुस्तक आहे
सौ पौर्णिमा शिवाजी शिंदे
प्राचीन काळापासून आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे सांगण्यात येत आहे आणि खरोखरच हे योग्य आहे.
परंतु बदलत्या परिस्थितीनुसार आपली विचारसरणी ही बदलत चालली आहे त्यानुसार लाखो रुपयांची गाडी घेऊन येतो तिला थोडसं खरचटलं तरी आपण हळ-हळ व्यक्त करतो परंतु लाखमोलाच्या शरीरासाठी आपण काय करतो? काय काळजी घेतो? हा प्रश्न स्वतःलाच विचारायची वेळ आता आलेली आहे.
आपण कुठे राहतो ? असं कोणी विचारलं तर आपण सहजच सांगतो घरात राहतो. वास्तविक आपण घरात नाही तर आपण आपल्या शरीरात राहतो हे प्रत्येकाने जाणले पाहिजे या पुस्तकातून शिवाजी शिंदे सरांनी आरोग्यरूपी संपत्तीचे जतन कसे करावे व त्याचा वारसा पुढच्या पिढीला कसा द्यावा हेच सांगितले आहे.




Reviews
There are no reviews yet.