Description
कुठल्याच पिढीचा प्रवास सरळ रेषेत होत नसतो. तो अनेक सुखदुःख, चुका, यशापयशाने भरलेला असतो. पिढी बदलते पण प्रवास निरंतर असतो. एका पिढीची संघर्षाची वाट पुढच्या पिढीसाठी समृद्धीचा मार्ग घेऊन येते. जगातील तत्वज्ञान, प्रेरणास्थाने शोधण्यापेक्षा आपल्याच कुटुंबांत अनुभवांचा खजिना असतो. आपण फक्त मोती वेचून हि शिदोरी पुढच्या पिढीला द्यायची. वर्तमानातून भविष्याकडे जाताना मात्र भुतकाळातील आठवणींचा प्रवास सोबत असावा.
ही माझ्या “आठवणींच्या प्रवासाची” शिदोरी आहे. मी काही लेखक, कवी नाही. आयुष्याकडे माझ्या नजरेतून बघताना जे सहज सुचत गेले ते कधी गद्यात तर कधी पद्यात लिहीत गेलो. आपणच आपल्या कथेचे नायक असतो. आपल्या कडु,गोड प्रसंगांचे आपल्यालाच कौतुक असते. भावनांना आपल्या शब्दात मांडण्याचा आनंद वेगळाच असतो. अनेक दिवस जे मनात विखुरलेले होते तेच पानात आलं .. ईतकचं
आठवणींच्या प्रवासात किती भेटले
किती आले, किती एक गेले
काही जपले, काही सुटले
काही अनोळखी आपले झाले
काही आपलेही परके झाले
काही सोबती ठाम राहीले
काही रुष्ट, काही संतुष्ट झाले
काही जन्म जन्माचे झाले..
विक्रांत मालती व्यंकटेश किंबहूने
कडूगोड क्षण, प्रवासातले
सहज म्हणूनी लिहीता लिहीता
आठवणींचे पुस्तक झाले




Reviews
There are no reviews yet.