Description
डॉ. अविनाश वैद्य आणि डॉ. मानसी गोरे या दोघांनी लिहिलेले “विस्तारवादी कुटीलनीतीचा चीन: भारतापुढील आव्हान” हे पुस्तक सर्वसामान्य मराठी वाचक डोळ्यासमोर ठेवून सोप्या भाषेत चीनचा इतिहास, त्याची संस्कृती, अर्थनीती, युद्धे, भू-राजकीय बाबी या संदर्भात केलेले विश्लेषण आहे. या पुस्तकाची लेखनशैली मला खूपच प्रभावी वाटली आहे.
आजमितीला चीनच्या रागलोभाची पर्व न करता भारताने आक्रमक धोरण पत्करले आहे. चीनची समस्या किंवा आव्हान खरंतर भारतासाठी येणाऱ्या काळात अनेक उत्तम संधीदेखील निर्माण करू शकते आणि त्यासाठीची धोरणे भारताने कशी आखली आहेत आणि आखणार आहे याबद्दलचा वास्तववाद सर्वसामान्य मराठी वाचकांना निश्चितच समजेल याबद्दल मला खात्री वाटते.
भारताची धोरणात्मक नीतीच चीनच्या आव्हानाचा प्रतिकार करू शकते या वास्तववादी आशावादाच्या भूमिकेवर हे पुस्तक पूर्ण होतं.
डॉ. अशोक मोडक.




Reviews
There are no reviews yet.