Description
शिक्षण घेत आहे. हे शिक्षण घेऊन परीक्षा उत्तम रीतीने पास होणे आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे किंवा आपल्या आवडीचा व्यवसाय करणे असे विचार तरुणांच्या मनात असतात. या मधे चुकीचे कांहीच नाही. पण या पुढे जाऊन तरुणांनी थोडा जीवनाविषयी मूलभूत विचार करण्यास शिकले पाहिजे. आचार्य विनोबांनी शिक्षणाचे मूळ उद्देश सांगितले,
(१) विद्यार्थ्याला जीवनाविषयी योग्य विचार करता यावा म्हणजे जीवनात “काय करावे आणि काय करु नये” हे योग्य प्रकारे समजावे.
(2) शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला स्वतः च्या पायावर उभे राहता यावे आणि पालकांवर अवलंबून राहण्याची पाळी नसावी.
(३) त्याचे चारित्र्य उत्तम घडावे.
हे उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होण्यासाठी तरुणाला भौतिक शिक्षणाबरोबर अध्यात्मिक शिक्षणाचीही आवश्यकता आहे. समाजाप्रती कृतज्ञता ठेवणे, प्रामाणिक राहणे, सर्वावर प्रेम करणे, आणि आत्मज्ञान प्राप्त करून उच्च मूल्यांचे जीवन जगणे हे माणसाकडून अपेक्षित आहे. आज जग सुसंस्कृत व्हावे असे वाटत असेल तर लोकांमध्ये सेवा व त्यागाची भावना जोपासणे गरजेचे आहे. त्यामुळे वस्तूंच्या मालकीची भावना कमी होईल.
वेदान्ताच्या अभ्यासाने हे साध्य होईल असे वाटते.
Reviews
There are no reviews yet.