Description
आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी हे जग सोडून जावे लागते. जन्म घेतला की मृत्यू ही अटळअसतो. ही गोष्ट अशा लोकांना समर्पित आहे, जे मृत्यूच्या भीतीने आजचे आनंदी जगणे सोडतात. मृत्यू आला तर काय? या एका विचारातून, ही पानसे काकूंची कथा जन्माला आली. भूतकाळातला विचार करून, स्वतःमध्ये नकारात्मक विचार आणायचे आणि भविष्याचा विचार करून टेन्शन घेत, आपण सगळेच जगत असतो. पण वर्तमानात जगणे, आपण विसरून जातो आणि शेवटच्या क्षणात आठवणीत ठेवण्यासारखे काही उरतच नाही. ही एक काल्पनिक कथा आहे, जी पानसे काकूंच्या माध्यमातून आपल्याला बरेच काही शिकवून जाते. आपल्या जवळचे माणूस गेले तरी, प्रत्येक वास्तूमध्ये आणि क्षणांमध्ये जिवंत असतो, जो आठवणींच्या रूपात आपल्या सोबत कायम रहातो. सुरवातीपासून ते शेवटपर्यंत, ही कथा मी जगली आहे आणि मला खात्री आहे की तुम्हीपण ती जगालच आणि तुमचा आयुष्याला बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलून जाईल.
Reviews
There are no reviews yet.